Tuesday 19 July 2016

सुवर्ण रोखे उपलब्धतेचा चौथा टप्पा सोमवारी

सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा पुढील टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. भौतिक रूपातील सोन्याच्या ऐवजी सोन्यासारखाच मूल्यवृद्धीचा लाभ देणाऱ्या रोख्याशी निगडित व्यवहार १८ जुलैपासून मुंबई शेअर बाजारात सुरू होणार आहेत. २२ जुलैपर्यंत खुल्या राहणाऱ्या या रोखे विक्रीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या ऑनलाइन मंचावरून नोंदणी करता येईल. ५, १०, ५० व १०० ग्रॅम वजनाच्या प्रमाणातील हे रोखे ५ ते ७
वर्षांसाठी उपलब्ध केले जात आहेत. आतापर्यंत तीन टप्प्यात सुवर्ण रोखे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यांचे एकूण मूल्य १,३२२ कोटी रुपये होते. २,८७२.३० किलो वजनासाठीच्या रोख्यांकरिता आतापर्यंत नोंदणी झाली आहे. सोन्याच्या ग्रॅममधील मूल्याच्या समकक्ष रोख्यांची योजना सरकारने सर्वप्रथम ३० ऑक्टोबर २०१५ मध्ये घोषित केली होती. सरकारच्या वतीने रिझव्र्ह बँक ते जारी करते. सोने धातूचा वापर कमी होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 

No comments:

Post a Comment