मानवी आरोग्य व समाधान, आदरातिथ्य सेवा, नाशिवंत अन्नाचे संवर्धन यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या वातानुकूलन आणि शीत प्रणाली ही विजेचा किफायतशीर वापर करणारी आणि अधिक पर्यावरणस्नेही बनविण्याची कटिबद्धता, ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनीयर्स (इशरे)’ या संस्थेने व्यक्त केली आहे. या व्यवसायाने हे अपारंपरिक वळण घेणे ही काळाची गरज
या विषयावर भारतातील या उद्योगक्षेत्रातील १० हजारांहून अधिक सदस्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इशरे’ने एका दिवसाच्या चर्चासत्राचे शुक्रवारी आयोजन केले होते. कोणत्याही आस्थापनेत वापरात येणाऱ्या विजेचा ६० ते ७० टक्के हिस्सा हा वातानुकूलन यंत्रणेवर खर्च होत असतो. हे पाहता भारतात २०३० साली सध्याच्या स्थापित क्षमतेच्या तुलनेत तीन पट अधिक विजेची गरज भासेल. या पाश्र्वभूमीवर अपारंपरिक प्रणाली वापरात आणून ही गरज निम्म्याने कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे या चर्चासत्राचे निमंत्रक आमोद दीक्षित आणि नंदलाल सिंग यांनी सांगितले. भारत सरकारने मॉन्ट्रियाल प्रोटोकॉल अंतर्गत व्यक्त केलेल्या कटिबद्धतेला अनुसरूनच हे पाऊल टाकले गेले आहे. संस्थेच्या या उपक्रमांत बडे उत्पादक आणि ‘राटा’सारख्या उद्योग संघटनांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment