Tuesday, 21 June 2016

रिझव्‍‌र्ह बँकेचे उज्जीवन फायनान्शिअलवर र्निबध

विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारावर बंदी लघु बँक परवाना मिळालेल्या उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसला विदेशी गुंतवणूक वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मज्जाव केला आहे. बंगळुरुस्थित उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस ही प्रस्तावित उज्जीवन स्मॉल बँकमधील हिस्सेदार कंपनी आहे. कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण यापूर्वीच मर्यादेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट करत कंपनीला नव्याने कोणतीही विदेशी
गुंतवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे कंपनीत आता समभाग खरेदीच्या माध्यमातून कोणत्याही विदेशी गुंतवणूक संस्था, नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार, अनिवासी भारतीयांना कंपनीत आता नव्याने गुंतवणूक करता येणार नाही. उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस काही महिन्यांपूर्वीच भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेच्या गुरुवारच्या दंडकामुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध उज्जिवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचा समभाग ३.३२ टक्क्य़ांनी आपटला. सत्रात ५ टक्क्य़ांपर्यंत नुकसान सोसणाऱ्या कंपनीचे समभागमूल्य दिवसअखेर ३७८.१० रुपयांवर स्थिरावले.

No comments:

Post a Comment