हिटलरने ज्यूंच्या केलेल्या संहारात वाचलेले प्रसिद्ध लेखक व शांततेचे नोबेल विजेते एली विसेल यांचे निधन झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात मारल्या गेलेल्या ज्यू लोकांच्या स्मृतीचे ते प्रतीक होते. ते ८७ वर्षांचे होते व अमेरिकेत वास्तव्यास होते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सांगितले, की ते आमच्यासाठी प्रकाशस्तंभ होते. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असलेल्या मानवतेचे ते प्रतीक होते. त्यांच्या निधनाने ज्यू
लोकांना तीव्र दु:ख होत आहे. एली हे शब्दांचे जादूगार होते व त्यांचे व्यक्तित्व त्यांच्या लेखनातून दिसले. मानवतेचा क्रूरतेवर विजय त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून दाखवून दिला. नाझींनी केलेल्या मानवी संहाराच्या अंधकारात ६० लाख बंधूभगिनी मारले गेले होते. पन्नास वर्षे त्यांनी हिंसाचारग्रस्त लोकांसाठी आवाज बुलंद केला. त्यांनी एकूण ४० पुस्तके लिहिली होती, त्यात नाईट नावाचे पुस्तक अभिजात कलाकृती मानली जाते. त्याची तुलना अॅनी फ्रँकस डायरीशी केली जाते. अ थाउजंड डार्कनेसेस या पुस्तकाचे लेखक व समीक्षक रूथ फ्रँकलिन यांनी म्हटले आहे, की ज्यूंनी केलेल्या संहारावरचे हे पुस्तक प्रभावी आहे. एलीझरच्या जीवनात काय घडले याची ती कथा आहे. १९२८ मध्ये रुमानियात त्यांचा जन्म झाला. ते १५ वर्षांचे असताना त्यांना नाझींनी ऑश्वित्झच्या छळछावणीत नेले, त्यात त्यांची आई व बहीण मरण पावली, ते मात्र वाचले. नंतर त्यांना बुशेनवाल्ड येथे छळछावणीत टाकण्यात आले. तेथे त्यांचे वडील गेले. १९४५ मध्ये छळछावणीतून मुक्त झाल्यानंतर ते फ्रान्सला गेले व १९५० मध्ये अमेरिकेला स्थायिक झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment