Friday 22 July 2016

विप्रोला टोरंटो विमानतळाचे कंत्राट


देशातील तिसरी मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोला कॅनडातील विमानतळासाठीचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनी ग्रेटर टोरंटो ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीकरिता पुढील सात वर्षांकरिता माहिती तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध करून देईल. ग्रेटर टोरंटो कंपनीमार्फत टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे परिचलन होते. उत्तर अमेरिकेतील अधिक वर्दळीचे हे विमानतळ आहे. पहिल्या तिमाहीत ६ टक्के नफ्यातील घसरण नोंदविणाऱ्या
विप्रोने मंगळवारी वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना दुसऱ्या तिमाहीकडून अवघ्या एक टक्का महसूल वाढीची अपेक्षा व्यक्त केली. कंपनीला जून ते सप्टेंबर दरम्यान १९३ ते १९५ कोटी डॉलरदरम्यान महसूल मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment