Friday 22 July 2016

निर्यातप्रधान क्षेत्रात रोजगारात घट!


कष्टाचे काम असलेले विविध क्षेत्र तसेच निर्यातीशी निगडित उद्योग-व्यवसायातील रोजगारात गेल्या वर्षांत ६७.९३ टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उभय क्षेत्रासह एकूणच औद्योगिक वातावरण संथ राहिल्याचा हा परिणाम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान एकूण रोजगारनिर्मितीदेखील कमी होत १.३५ लाखांवर येऊन ठेपली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वाणिज्य व
उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी दिली. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कामगार चमूच्या तिमाही रोजगार सर्वेक्षणाचा दाखला त्यांनी दिला. यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०१४ दरम्यान ४.२१ लाख कर्मचारी/ कामगार भरती झाली आहे. तर पुढील वर्षांत, २०१५मध्ये ती १.३५ लाख नोंदली गेली आहे. निर्यातप्रधान व्यवसायांमध्ये गेल्या वर्षांत १.२२ लाख रोजगारनिर्मिती झाल्याचेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment