Tuesday 19 July 2016

राहुल गांधींनी संघाची माफी मागावी - न्यायालय


नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) हत्या केल्याच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना फटकारत त्यांनी संघाची माफी मागावी, अन्यथा सुनावणीला सामोरे जावे असे म्हटले आहे. महात्मा गांधी यांची हत्या संघाने केल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान केले होते. या वक्तव्याविरोधात संघाचे
भिवंडी शाखेचे सचिव राजेश कुंटे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे संघाच्या प्रतिष्ठेला धोका पोहचल्याचे म्हटले होते.

आज या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींनी मारणे आणि संघाने महात्मा गांधींना मारणे या दोन्ही वाक्यांमध्ये खूप फरक आहे. एखाद्या संघटनेबाबत बोलताना सतर्कता बाळगायला हवी होती. त्यामुळे त्यांनी संघाची माफी मागावी अन्यथा सुनावणीला सामोरे जावे. राहुल गांधींनी माफी मागितल्यास सुनावणीला सामोरे जावे लागणार नाही. या प्रकरणी राहुल गांधी यांना आपली बाजू मांडण्यासाठी 27 जुलैपर्यंत वेळ देण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment