Friday 22 July 2016

पद्मश्री विजेते हॉकीपटू मोहम्मद शाहीद यांचे निधन

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचे  निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून शाहीद मूत्रपिंड आणि यकृताच्या व्याधीने त्रस्त होते.  गुरगावमधील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहम्मद शाहीद यांनी १९८०, १९८४ आणि १९८८ अशा सलग तीन वेळा भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व केले. १९८० साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने
मोस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. १९८२ आणि १९८६ च्या आशियायी स्पर्धामध्ये शाहिद यांच्या नेतृत्वाखाली रौप्य आणि कास पदकाला गवसणी घातली होती. त्यांच्या या अफलातून कामगिरीनंतर १९८० साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले. तर १९८६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment