Tuesday, 21 June 2016

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास रघुराम राजन यांचा नकार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म द्यावी का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. मात्र, ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार
नाहीत. गव्हर्नरपदाची मुदत संपुष्टात आल्यानंतर ते पुन्हा शिकागोत अध्यापनाचे काम करणार आहेत. राजन यांनी रिझर्व्ह बँकेतील सहकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात असे म्हटले आहे. मी देशाची सेवा करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेन.  माझा उत्तराधिकारी रिझर्व्ह बँकेला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, अशी आशा मी करतो, असे राजन यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांना गव्हर्नरपद मिळण्यासाठी जोरदार आघाडी उघडली होती. त्यांनी राजन यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत त्यांना दुसरी टर्म न मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहली होती. याशिवाय, व्याजदराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्योसबत राजन यांचे मतभेद असल्याचे अनेकदा दिसून आले होते.  मात्र, केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि काँग्रेसकडून राजन यांच्या निर्णयांची पाठराखण करण्यात आली होती. स्वत: राजन यांनीही काही दिवसांपूर्वी राजन यांनी आपण दुसऱ्या टर्मसाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. 

No comments:

Post a Comment