Wednesday 13 July 2016

मारिया शारापोव्हा ऑलिम्पिकपासून वंचित


उत्तेजक सेवनाबद्दल घातलेल्या बंदीविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीला आणखी दोन महिने लागणार असल्यामुळे रशियाची अव्वल दर्जाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ही आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून वंचितच राहणार आहे. बंदीच्या निर्णयाविरुद्ध शारापोव्हाने क्रीडा लवादापुढे अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीच्या वेळी
आपण उत्तेजक घेतले असल्याची कबुली शारापोव्हाने दिली होती. त्यानंतर तिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. बंदीचा निर्णय खूप निराशाजनक असल्याचे शारापोव्हाने म्हटले आहे. बंदीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अर्जाबाबत अधिक माहिती देण्यासाठी क्रीडा लवाद व शारापोव्हा यांनी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. बंदीविरुद्ध केलेल्या अर्जावर १९ सप्टेंबरपूर्वी निर्णय घेतला जाणार आहे.

No comments:

Post a Comment