Tuesday 19 July 2016

खांडू अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री

पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस पक्षाकडून नाटय़मय घडामोडीनंतर पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ३७ वर्षीय खांडू हे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. तर चोवना मेन यांनी या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी शपथ दिली. काँग्रेसचे ४५ पक्षाचे आणि दोन अपक्षांचा सरकारला पाठिंबा असल्याचा दावा खंडू यांनी
केला होता. राज्यपाल आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करू खांडू यांनी सांगितले. सध्या त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांच्यावर अरुणाचलची अतिरीक्त जबाबदारी आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या संपूर्ण विकासासाठी अथक प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

No comments:

Post a Comment