Wednesday 27 July 2016

बोल्टचे ‘सुसाट’ पुनरागमन!


२०० मीटर शर्यतीत विजय; केंड्राचा विश्वविक्रम. दुखापतीमुळे काही काळ मैदानापासून दूर गेलेल्या जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने लंडन येथील मैदानी स्पध्रेत त्याच्या प्रतिमेप्रमाणे ‘सुसाट’ पुनरागमन केले. त्याने २०० मीटर शर्यतीत सहज विजय मिळवून उपस्थित ४० हजार प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. मात्र, याचवेळी अमेरिकेच्या केंड्रा हॅरिसन हीने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील २८ वर्षांचा विश्वविक्रम मोडला.

लंडनच्या याय मैदानावर चार वर्षांपूर्वी बोल्टने वैयक्तिक आणि ४ बाय १०० मीटरचे सुवर्णपदक पटकावले होते आणि त्यामुळे त्याचे आकर्षण उपस्थित प्रेकक्षांमध्ये होते.  जून महिन्यात दुखापतीमुळे बोल्टने ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेतून माघार घेतली होती. त्यानंतर पहिल्यांदा २०० मीटर शर्यतीत धावत त्याने १९.८९ सेकंदाची वेळ नोंदवून बाजी मारली. पनामाच्या अलोन्सो एडवर्डने हंगामातील सर्वोत्तम २०.०४ सेकंदाची वेळ नोंदवून दुसरे, तर ब्रिटनच्या अ‍ॅडम गेमिलीने २०.०७ सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. ‘‘विजय मिळवला असला तरी अजूनही पुर्णपणे तंदुरूस्त नाही.  कठोर परिश्रमाची गरज आहे. ऑलिम्पिक जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज आहे,’’ असे बोल्ट म्हणाला.
अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या केंड्राने हॅरिसनने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला. तिने १२.२० सेकंदात शर्यत पूर्ण करून १९८८साली बल्गेरियाच्या योर्डाका डोन्कोव्हाने नोंदवलेला विश्व विक्रम शतांश सेकंदाच्या फरकाने मोडला. डोन्कोव्हाने १२.२१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.

No comments:

Post a Comment