गेल्या वर्षीच्या महापुराच्या तडाख्यातून सावरू पाहणाऱ्या उत्तराखंडवर गुरुवारी रात्री ढगफुटीचं संकट कोसळलं. रात्रभर झालेल्या पावसानंतर चमोली व पिथौरागड येथे ढगफुटी होऊन ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. डोंगरभागात वसलेल्या उत्तराखंडात गेल्या २४ तासांत तब्बल ५४ मिमी पाऊस झाला असून येथील सर्व नद्या, नाले तुडुंब भरून वाहत
आहेत. काही ठिकाणी पुरामुळं घरं व जनावरे वाहून गेली आहेत. हृषिकेश-भद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्यानं हा मार्गच बद झाला आहे. जमीन खचल्यानं यमुनोत्री महामार्गाचंही नुकसान झालं आहे. गंगोलगाव येथे जमीन खचल्यानं केदारनाथ महामार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशाला मनाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment