Friday, 1 July 2016

रवी शास्त्रींनी दिला आयसीसीच्या समितीचा राजीनामा


भारतीय क्रिकेट संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आयसीसीच्या या समितीचे अध्यक्षपद अनिल कुंबळे याच्याकडे आहे. शास्त्री यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीपासून सुरु झालेल्या वादाने एक नव वळण घेतले आहे. प्रशिक्षकपदाची माळ कुंबळेच्या गळ्यात पडल्यानंतर नाराज झालेल्या शास्त्री यांनी माजी कर्णधार
आणि बीसीसीआयचे सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुलीवर जोरदार टीका केली होती. आता आयसीसी समितीमधून राजीनामा देवून शास्त्री यांनी कुंबळे सोबत काम करायचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. शास्त्री या समितीवर माध्यम प्रतिनिधी म्हणून काम करत होते. या समितीवर आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हे देखील सदस्य आहेत.

काय आहे हे प्रकरण

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गांगुली आणि शास्त्री या दोन माजी क्रिकेटपटूमध्ये शाब्दिक वादावादी सुरु झाली आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी शास्त्री, कुंबळे यांच्यासह एकूण ५७ जणांनी अर्ज केला होता. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने प्रशिक्षकपदी कुंबळेची निवड केली. प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने नाराज झालेल्या शास्त्री यांनी थेट गांगुलीवर टीका केली. गांगुलीमुळेच आपली प्रशिक्षकपदी निवड झाली नसल्याचा आरोप शास्त्री यांनी केला. 

No comments:

Post a Comment