Tuesday 19 July 2016

हरिकाची जेतेपदाला गवसणी

भारताची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने फिडे महिला ग्रां.प्रि. विजेतेपदाला गवसणी घातली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हरिकाने अखेरच्या फेरीत रशियाच्या ओल्गा गिऱ्याशी बरोबरी साधली आणि कारकीर्दीतील पहिल्या वहिल्या ग्रॅण्ड प्रिक्स जेतेपदावर मोहर उमटवली. जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पध्रेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले.
भारताची आणखी एक ग्रँडडमास्टर कोनेरू हम्पीच्या खात्यावरसुद्धा ७ गुण जमा होते. मात्र स्पध्रेतील उत्तम बरोबरीच्या निकालांच्या आधारे हरिकाला विजेती म्हणून घोषित करण्यात आले. ‘‘अखेरच्या फेरीत माझ्यावर कमालीचे दडपण जाणवत होते. मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवू शकले नाही. परंतु कारकीर्दीत प्रथमच ग्रां.प्रि. विजेतेपद मिळाल्याचा अतिशय आनंद होत आहे,’’ असे हरिकाने या वेळी सांगितले. हरिका आणि ओल्गा यांच्यातील अखेरची फेरी ६२ चालींनंतर बरोबरीत सुटली. हरिकाच्या विजयानंतर चेंगडू एरिना येथे भारताचे राष्ट्रगीत ऐकवण्यात आले. या वेळी ती अतिशय भावुक झाली होती.

No comments:

Post a Comment