कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांनी विश्वविक्रमी भागीदारी रचत त्रिन्बागो नाइट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५० धावांची भागादारी रचल्यामुळे त्रिन्बागो संघाला १७० धावांचा पाठलाग करता आला. त्रिन्बागोच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोस ट्रायडेन्ट संघाला १५९ धावा करता आल्या आणि त्रिन्बागो
संघाने ११ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी हा विक्रम योगेश ताकवले आणि साईराज बहुतले यांच्या नावावर होता. त्यांनी २००७ च्या आयपीएलच्या हंगामात पाचव्या विकेटसाठी १४९ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना त्रिन्बागो संघाची ४ बाद २० अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर अमला-ब्राव्हो जोडीने संघाला सावरत आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अमलाने यावेळी ५४ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८१ धावांची खेळी साकारली, तर ब्राव्होने ४६ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.
No comments:
Post a Comment