Tuesday 19 July 2016

आयसीआयसीआय बँकेचे ‘स्वच्छ सोसायटी’ पुरस्कार

आयसीआयसीआय बँकेचे ‘स्वच्छ सोसायटी’ पुरस्कार मुंबई : आयसीआयसीआय बँकेने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील (एमएमआर) स्वच्छ व हरित उपक्रमांची दखल घेण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी निवासी हाऊसिंग सोसायटय़ांसाठी विशेष स्पर्धा घोषित केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट ‘स्वच्छ भारत अभियाना’ची प्रेरणा कायम राखणे हे असून ५० दिवसांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम निवासी सोसायटींनी
केलेल्या ऊर्जा संवर्धन, रेनवॉटर हार्वेिस्टग, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ-हरित तंत्रज्ञानाचा अवलंब अशा प्रयत्नांचे दखल घेईल, त्यांचे मूल्यमापन करेल व त्यांचा गौरव करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य आणि ‘क्लीन क्रुसेडर इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’ अशा श्रेणींतील निवडक प्रवेशिकांना ३० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी यानिमित्ताने मिळेल, असे बँकेने नमूद केले आहे. ‘स्वच्छ सोसायटी अ‍ॅवॉर्डस’ मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई व वसई-विरार या महानगरपालिका आणि पनवेल, खारघर, कळंबोली या नगर परिषदांमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व निवासी सोसायटय़ांसाठी खुले आहेत. सहयोगी स्टेट बँकांचा आज संप व्यापार प्रतिनिधी, मुंबई मुख्य बँकेतील विलिनीकरणाच्या विरोधात पाच सहयोगी स्टेट बँकेतील कर्मचारी, अधिकारी मंगळवार १२ जुलै रोजी एक दिवसाचा संप पुकारत आहेत. तर दुसऱ्या दिवशी, बुधवार – १३ जुलै रोजी सर्व सार्वजनिक बँकांमध्ये शाखा बंद पुकारले जाणार आहे. मंगळवारच्या स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांमधील ५०,००० कर्मचारी संपात सहभागी होतील. तर बुधवारच्या संपात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांचे ६ लाखांहून अधिक कर्मचारी भाग घेतील, अशी माहिती ‘ऑल इंडिया बँक्स एम्प्लॉइज असोसिएशन’ने दिली आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाळा व स्टेट बँक ऑफ मैसूर या पाच सहयोगी बँकांसह भारतीय महिला बँकेला मुख्य स्टेट बँकेत सामील करून घ्यावयाची शिफारस स्टेट बँक व्यवस्थापनाने गेल्या महिन्यात केली होती. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही परवानगी मिळाली आहे. ही प्रक्रिया मार्च २०१७ पर्यंत होणार आहे. 

No comments:

Post a Comment