चीनने जगातील सर्वांत वेगवान सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे. विशेष म्हणजे त्याचे डिझाईन बनवण्यासाठी कोणत्याही विदेशी प्रोसेसरचा वापर करण्यात आला नाही. हा सुपर कॉम्प्युटर सेकंदाला 930 लाख अब्ज गणना करू शकतो. चीनच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ पॅरॅलल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने हा सुपर कॉम्प्युटर बनवला आहे. तो पूर्णपणे चिनी प्रोसेसरच्या मदतीने विकसित केला आहे. हा सुपर कॉम्प्युटर
चीनच्या नॅशनल सुपर कम्युटिंग सेंटरमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याने इंटेल आधारित ‘तियानहे-2’ ला मागे टाकले आहे. हा सुपर कॉम्प्युटर टॉप 500 सुपर कॉम्प्युटरच्या यादीत गेल्या सहा वर्षांपासून अव्वल क्रमांकावर होता. ही यादी वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध केली जाते. चीनचा हा नवा सुपर कॉम्प्युटर ‘तियानहे-2’ च्या तुलनेत दुप्पट वेगवान आणि तिप्पट अधिक क्षमता असलेला आहे. ‘तियानहे-2’ प्रतिसेकंद 338.6 लाख अब्ज गणना करू शकतो. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचा ‘टायटन’ हा सुपर कॉम्प्युटर 175.9 लाख अब्ज गणना क्षमतेनिशी तिसर्या स्थानावर आहे.
No comments:
Post a Comment