Thursday, 23 June 2016

नवबौद्धांना दिलासा

अनुसूचित जातींमधून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना केंद्रातील शिक्षण-नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच जात प्रमाणपत्राचा नवीन नमुना जारी करणार आहे. आठ राज्यांतील पाच कोटी नवबौद्धांना या बदलांचा फायदा होणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. गेली २६ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. नवबौद्धांना आरक्षणाचे लाभ देण्यासाठी १९९०मध्ये
कायद्यामध्ये सुधारणा झाली. मात्र केंद्रीय जात प्रमाणपत्राच्या आराखड्यात नवबौद्धांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे या नवबौद्धांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत होते.  

No comments:

Post a Comment