नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या ह्युमन राइटस् अवेअरनेस असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केली होती. पंजाबची खराब
प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न ‘उडता पंजाब‘मधून केल्याचे म्हणत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी याचिकेत केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका या संदर्भातील याचिका पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत फेटाळून लावली आहे. या याचिकेवर न्यायाधीश आदर्श कुमार गोएल आणि एल. नागेश्वरा राव यांच्या सुटीच्या खंडपीठाने सुनावणी केली.
No comments:
Post a Comment